matru - pitru devo bhavah ...price-2 RS/- ( marathi)
इस पुस्तक के कुछ अंश ...
जरा विचार करा...
२८ विकसित देशांमध्ये
·
दरवर्षी अवध्या १३ ते १९
वर्षाच्या वयोगटात गर्भवती होणाऱ्या कुमारिका -१२,५०,०००
·
त्यांपैकी दरवर्षी गर्भपात
करविणाऱ्या कुमारिका ५,००,०००
·
बाकीच्या कुमारी माता बनून
सरकार व आई-वडिलांवर ओझे बनणाऱ्या, वेश्यावृत्ती धारण करणाऱ्या कुमारिका - ७,५०,०००
(इन्नोसंटी रिपोर्ट
कार्डनुसार) ‘व्हेलेंटाइन डे’ चा दुष्परिणाम
काय तुम्हाला वाटते कि आपल्या देशाची बाल व
तरुण पिढी विकारी आकर्षणे, अश्लीलता आणि व्यसनांमध्ये गुरफटून विकृत मानसिकतेची व्हावी तसेच
व्याधी, तणाव आणि चिंताग्रस्त होऊन तिचा सत्यानाश व्हावा ? आपल्या देशातही संतती असूनही आई-वडिलांनी निराधार होऊन
वृद्धाश्रमांमध्ये पडून रहावेत ?
चला तर साजरा करूया...
१४ फेब्रुवारी मातृ-पितृ पूजन दिवस...
कारण प्रेम तर पवित्र असते...
१४ फेब्रुवारीला मुले-मुली एकमेकांना
फूल देतात. एकमेकांना फुल देणे, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो/करते...’
आय लव्ह यु म्हणणे
हि किती लज्जास्पद गोष्ट आहे ! यामुळे लोफर मुले-मुलीच जन्माला येत आहेत.
ही घाण विदेशातून आली आहे. मुला-मुलींना या विदेशी
घाणीपासून वाचवून आपणास त्यांना भारतीय संस्कृतीच्या सुवासाने सुवासित करायचे आहे
सर्व धर्मांचा एकच गजर, माता-पित्याचा करा आदर |
सर्वकाही मिळेल पण
आई-वडील मिळणार नाही
श्रीगानेशांनी जशी पार्वतीमाता आणि महादेवांची
पूजा केली, अगदी असेच तुम्ही १४ फेब्रुवारीला आपल्या आई-वडिलांची पूजा करा. यादिवशी
मुला-मुलांनी आई-वडिलांच्या डोक्यावर फुले वाहावीत, पुष्पहार घालावा, नमस्कार
करावा, मुले व आई-वडिलांनी एकमेकांना गोडधोड खाऊ घालावे तसेच आई-वडिलांनी आपल्या
मुलांवर प्रेम करावे आणि शुभाशीर्वाद धावे.
म्हातारपणात आपल्या आई-वडिलांशी तुच्छ व्यवहार करू नका, त्यांना
वृद्धाश्रमात सोडू नका. चुकुनही आपल्या आई-वडिलांचा तिरस्कार करू नका. दुसरे
सर्वकाही मिळेल पण आई-वडिल मिळणार नाही. कितीतरी दु:ख सहन करून आईने आपल्याला जन्म
दिला, संगोपन करून मोठे केले. त्यांचा आशीर्वाद घ्या, मंगलमय जीवन व्यतीत करा, तुमचे
(कल्याण) होईल मुला-मुलींनो ! मग तुमची मुलेही तुमचा असा आदार करतील.
Comments